Posts

Showing posts from April 5, 2020

नेहमी आनंदी कसे राहावे

Image
     मन हा खरे तर आपल्या शरीराचा किंवा जीवनाचा अदृश्य भाग पण सर्व जीवन व्यापुन टाकणारा असा अवयव.       तुकाराम महाराज म्हणतात ,            "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण."             मन प्रसन्न असेल तरं सर्व काही साध्य करता येत. मनाला प्रसन्न ठेवणं, हे काही अंशी आपल्या हातात, तर काही अंशी परिस्थितीच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला परिस्थिती आणि मनस्थिती यांची सांगड घालता यायला हवी. परिस्थिती अनुकूल नसेल तर त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती बदलणं कधीकधी आपल्या आवाक्याबाहेर असते, अश्यावेळी मनस्थिती बदलून परिस्थितीशी जुळवुन घ्यावे. त्यामुळे होणार मनस्ताप बऱ्याच अंशी कमी होतो. त्यामुळे परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. त्यामुळे सुखाचा एक दरवाजा तुमच्यासाठी उघडेल.           कोणतीही गोष्ट अपल्यामनात यायला उशीर असतो. एकदा का मनाने ठरवलं, तर ते कार्य सिद्दीस नक्कीच जातं. कारण मनापेक्षा powerful असे या जगात काहींच नाही. त्यामळे य...