Posts

POSTS

स्त्री स्वातंत्र्य काल आणि आज

"फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश." स्त्रियांसाठी आता आकाश मोकळे झालेले आहे. मोकळ्या आकाशात वावरताना कधी कधी जाणीव होते परलंबितवाची कारण वर वर दिसणारे मोकळे आकाश खरेच मोकळे असते का? स्त्री ही स्वभावतःच समजूतदार असल्यामुळे तिला मिळालेला मोकळेपणा हा जबाबदारीच्या अदृश्य साखळदंडनी वेढलेला असतो. फार पूर्वी च्या काळी मोकळे आकाश सोडाच मोकळा श्वासही स्त्रीला घेता येत नसे मोकळा श्वास घाययला त्या स्त्रीला जगात यायलाच बंदी होती. पूर्वीच्या काळी स्त्रीपुरुष असा भेद भाव असे मुलांना चांगले शिक्षण तर मुलीना घरकामाला जुंपले जायचे कित्तेक घरात एका पाठोपाठ मुलीच होत राहिल्या तर दुसऱ्या लग्नाची तयारी किंवा गर्भपात करायची तयारी असायची. नीलाताईंना एकापाठोपाठ एक तीन मुली झाल्या प्रत्येक वेळी घरच्यांना मुलाची अपेक्षा होती. चौथ्यांदा गर्भलिंगनिदान केल्यावर चौथ्यांदा मुलगीच आहे हे कळाल्यावर सासरच्या गर्भपात करायच दडपण नीलाताईंनवर आणले. नीलाताईं खूप खचल्या पण शेवटी निलताईंनी सर्वांचा विरोध पथकरून मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना बराच सासरवास...

नेहमी आनंदी कसे राहावे

Image
     मन हा खरे तर आपल्या शरीराचा किंवा जीवनाचा अदृश्य भाग पण सर्व जीवन व्यापुन टाकणारा असा अवयव.       तुकाराम महाराज म्हणतात ,            "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण."             मन प्रसन्न असेल तरं सर्व काही साध्य करता येत. मनाला प्रसन्न ठेवणं, हे काही अंशी आपल्या हातात, तर काही अंशी परिस्थितीच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला परिस्थिती आणि मनस्थिती यांची सांगड घालता यायला हवी. परिस्थिती अनुकूल नसेल तर त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती बदलणं कधीकधी आपल्या आवाक्याबाहेर असते, अश्यावेळी मनस्थिती बदलून परिस्थितीशी जुळवुन घ्यावे. त्यामुळे होणार मनस्ताप बऱ्याच अंशी कमी होतो. त्यामुळे परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. त्यामुळे सुखाचा एक दरवाजा तुमच्यासाठी उघडेल.           कोणतीही गोष्ट अपल्यामनात यायला उशीर असतो. एकदा का मनाने ठरवलं, तर ते कार्य सिद्दीस नक्कीच जातं. कारण मनापेक्षा powerful असे या जगात काहींच नाही. त्यामळे य...

राग का व कसा

Image
       माणसाच्या आयुष्यात  राग नावाचा शब्द किंवा भावना जर नसेल तर कसं असेल आपले आयुष्य कल्पना करून पाहा         राग जर कुणाला आलाच नसता तर सगळेच एकमेकांशी गोड वागले असते आणि  त्या गोड आणि चांगल्या वागण्याला काही किमतच राहिली नसती. कारण प्रत्येक वाईट गोष्टी मुळे चांगल्या गोष्टीची किंमत वाढते         राग हा प्रमाणात असेल तर तो खरच  चांगला आहे. आलेल्या रागाचाही उपयोग होतो याच एक उदाहरण  सांगतो. एक सर्वसाधारण 40 ते 45% मार्क घेणाऱ्या मुलाला एकदा सर खूप रागावतात  त्याचा खूप अपमान करतात त्यामुळे त्या मुलाला त्या सरांचा प्रचंड राग येतो. आणि तो मुलगा सरांना   रागारागाने म्हणतो 80% मार्क घेऊन दाखवतो. त्या मुलाने त्याला आलेल्या रागाचा असा उपयोग करून घेतला.         माणसांच्या आयुष्यातील खूप समस्या या विनाकारण व्यक्त केलेल्या रागमुळे आणि कधीही न केलेल्या प्रेमामुळे निर्माण होतात.योग्य वेळी राग व्यक्त कर. योग्य वेळी प्रेमही व्यक्त करता आले पाहिजे. थोड्या प्रमाणातील राग हा वा...

आईवडील, कुटुंब आणि पिढीमधील सुवर्णमध्य

Image
        आज माझी ही पहिली पोस्ट. खरे तरं मे ही पोट लिहिली नाही. चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी मी नाही तर माझ्या आई ने ही पोस्ट लिहिली आहे. मला तरी वाटते की ह्या पेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही....                  काल देवाची पूजा करत होते, पूजा करताना मला पाठ असलेले स्तोत्रे मी म्हणते. पण रोज पटापट काम उरकायच्या नादात आपण काय म्हणतोय याकडे काही बारीक लक्ष नव्हतं. पण स्तोत्र म्हणता म्हणता मी देवापराधाने थोडं थबकले. तरी स्तोत्र म्हणणे चालू होतेच, त्यात ओवी होती ती अशी,            "कुपुत्रो जयेत क्वचितपी।। कुमाता न भवती."             ह्या ओवीने अंतर्मुख केले , पुत्र हा क्वचित कुपुत्र असु शकतो, पण माता ही कधीही कुमाता कुमाता असू शकत नाही.           आईवडील आणि मुलाचं नातं हे खरचं दोन्ही बाजूने समान असत का? माझ्यामते आईकडून नेहमीच ते मुलापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे निभावले जाते. त्यापरीने मुलं ते निभावताना समाजात दिसत नाहीयेत. म...