नेहमी आनंदी कसे राहावे
मन हा खरे तर आपल्या शरीराचा किंवा जीवनाचा अदृश्य भाग पण सर्व जीवन व्यापुन टाकणारा असा अवयव.
तुकाराम महाराज म्हणतात ,
"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण."
मन प्रसन्न असेल तरं सर्व काही साध्य करता येत. मनाला प्रसन्न ठेवणं, हे काही अंशी आपल्या हातात, तर काही अंशी परिस्थितीच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला परिस्थिती आणि मनस्थिती यांची सांगड घालता यायला हवी. परिस्थिती अनुकूल नसेल तर त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती बदलणं कधीकधी आपल्या आवाक्याबाहेर असते, अश्यावेळी मनस्थिती बदलून परिस्थितीशी जुळवुन घ्यावे. त्यामुळे होणार मनस्ताप बऱ्याच अंशी कमी होतो. त्यामुळे परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. त्यामुळे सुखाचा एक दरवाजा तुमच्यासाठी उघडेल.
कोणतीही गोष्ट अपल्यामनात यायला उशीर असतो. एकदा का मनाने ठरवलं, तर ते कार्य सिद्दीस नक्कीच जातं. कारण मनापेक्षा powerful असे या जगात काहींच नाही. त्यामळे या मनाला खूप जपा, त्याला योग्य पोषण द्या. म्हणजे आपल्या हातून जीवनात खूप चांगले कार्य घडू शकते.
एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असेल किंवा आपल्याला करावी लागत असेल तर आपलं मन दुखावलं जात. कोणी आपला अपमान करत असेल तर वाईट वाटून न घेता त्या व्यक्तीचा प्रतिकार चुकूनही करू नका, म्हणजे आपल्या मानास्तापात आणखी भर पडणार नाही. त्याला एकच उपाय म्हणजे दुर्लक्ष करणे कारण कोणी काय बोलावे, कोणी कसे वागावे हे काही आपल्या हातात नसते. जो तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. त्यामुळे स्वतःच्या जीवनात आनंद शोधायचा असेल तर चक्क दुर्लक्ष नावाची चावी फिरवायची आणि सुखाचे दरवाजे आपल्यासाठी खुले करायचे.
त्यामुळे प्रत्येक चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सुखी राहा आनंदी राहा. तुमच्या सकारात्मक व चांगल्या जीवनाला माझ्या शुभेच्छा!!!
लेखक - सौ. संगीता दिग्रसकर

Comments
Post a Comment