मन हा खरे तर आपल्या शरीराचा किंवा जीवनाचा अदृश्य भाग पण सर्व जीवन व्यापुन टाकणारा असा अवयव. तुकाराम महाराज म्हणतात , "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण." मन प्रसन्न असेल तरं सर्व काही साध्य करता येत. मनाला प्रसन्न ठेवणं, हे काही अंशी आपल्या हातात, तर काही अंशी परिस्थितीच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला परिस्थिती आणि मनस्थिती यांची सांगड घालता यायला हवी. परिस्थिती अनुकूल नसेल तर त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती बदलणं कधीकधी आपल्या आवाक्याबाहेर असते, अश्यावेळी मनस्थिती बदलून परिस्थितीशी जुळवुन घ्यावे. त्यामुळे होणार मनस्ताप बऱ्याच अंशी कमी होतो. त्यामुळे परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. त्यामुळे सुखाचा एक दरवाजा तुमच्यासाठी उघडेल. कोणतीही गोष्ट अपल्यामनात यायला उशीर असतो. एकदा का मनाने ठरवलं, तर ते कार्य सिद्दीस नक्कीच जातं. कारण मनापेक्षा powerful असे या जगात काहींच नाही. त्यामळे य...
आज माझी ही पहिली पोस्ट. खरे तरं मे ही पोट लिहिली नाही. चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी मी नाही तर माझ्या आई ने ही पोस्ट लिहिली आहे. मला तरी वाटते की ह्या पेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही.... काल देवाची पूजा करत होते, पूजा करताना मला पाठ असलेले स्तोत्रे मी म्हणते. पण रोज पटापट काम उरकायच्या नादात आपण काय म्हणतोय याकडे काही बारीक लक्ष नव्हतं. पण स्तोत्र म्हणता म्हणता मी देवापराधाने थोडं थबकले. तरी स्तोत्र म्हणणे चालू होतेच, त्यात ओवी होती ती अशी, "कुपुत्रो जयेत क्वचितपी।। कुमाता न भवती." ह्या ओवीने अंतर्मुख केले , पुत्र हा क्वचित कुपुत्र असु शकतो, पण माता ही कधीही कुमाता कुमाता असू शकत नाही. आईवडील आणि मुलाचं नातं हे खरचं दोन्ही बाजूने समान असत का? माझ्यामते आईकडून नेहमीच ते मुलापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे निभावले जाते. त्यापरीने मुलं ते निभावताना समाजात दिसत नाहीयेत. म...
माणसाच्या आयुष्यात राग नावाचा शब्द किंवा भावना जर नसेल तर कसं असेल आपले आयुष्य कल्पना करून पाहा राग जर कुणाला आलाच नसता तर सगळेच एकमेकांशी गोड वागले असते आणि त्या गोड आणि चांगल्या वागण्याला काही किमतच राहिली नसती. कारण प्रत्येक वाईट गोष्टी मुळे चांगल्या गोष्टीची किंमत वाढते राग हा प्रमाणात असेल तर तो खरच चांगला आहे. आलेल्या रागाचाही उपयोग होतो याच एक उदाहरण सांगतो. एक सर्वसाधारण 40 ते 45% मार्क घेणाऱ्या मुलाला एकदा सर खूप रागावतात त्याचा खूप अपमान करतात त्यामुळे त्या मुलाला त्या सरांचा प्रचंड राग येतो. आणि तो मुलगा सरांना रागारागाने म्हणतो 80% मार्क घेऊन दाखवतो. त्या मुलाने त्याला आलेल्या रागाचा असा उपयोग करून घेतला. माणसांच्या आयुष्यातील खूप समस्या या विनाकारण व्यक्त केलेल्या रागमुळे आणि कधीही न केलेल्या प्रेमामुळे निर्माण होतात.योग्य वेळी राग व्यक्त कर. योग्य वेळी प्रेमही व्यक्त करता आले पाहिजे. थोड्या प्रमाणातील राग हा वा...
Comments
Post a Comment