आईवडील, कुटुंब आणि पिढीमधील सुवर्णमध्य

        आज माझी ही पहिली पोस्ट. खरे तरं मे ही पोट लिहिली नाही. चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी मी नाही तर माझ्या आई ने ही पोस्ट लिहिली आहे. मला तरी वाटते की ह्या पेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही....
       
         काल देवाची पूजा करत होते, पूजा करताना मला पाठ असलेले स्तोत्रे मी म्हणते. पण रोज पटापट काम उरकायच्या नादात आपण काय म्हणतोय याकडे काही बारीक लक्ष नव्हतं. पण स्तोत्र म्हणता म्हणता मी देवापराधाने थोडं थबकले. तरी स्तोत्र म्हणणे चालू होतेच, त्यात ओवी होती ती अशी,
           "कुपुत्रो जयेत क्वचितपी।। कुमाता न भवती."
 
          ह्या ओवीने अंतर्मुख केले , पुत्र हा क्वचित कुपुत्र असु शकतो, पण माता ही कधीही कुमाता कुमाता असू शकत नाही.

          आईवडील आणि मुलाचं नातं हे खरचं दोन्ही बाजूने समान असत का? माझ्यामते आईकडून नेहमीच ते मुलापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे निभावले जाते. त्यापरीने मुलं ते निभावताना समाजात दिसत नाहीयेत. मला असं नाही म्हणायचं की निभावली जात नाही. जिथे निभावली जातात तिथं नंदनवन असत अस म्हणायला हरकत नाही.

         मुलं मोठी झाल्यावर त्यांच स्वतःच जग, स्वतःचे स्वतंत्र विचार असतात, हे आईवडिलांनी समजून घेवून थोडं त्यांना मोकळं आकाश दिलं तर ही पिल्ल एक दिवस नक्की आकाशात उंच भरारी घेतील. असं म्हणतात की दर 10 वर्षांनंतर पिढी बदलते, त्यामुळे जुन्यापिढीने सगळंच जुनं कवटाळून न बसता, जुनं ते सोनं म्हणतात तेच सोनं असलेल्या चांगल्या गोष्टी स्वीकारून, त्या नवीन पिढीला देऊन नवीन आणि जुन्या पिढीचा समन्वय साधावा. जर एक पिढीने पुढच्या पिढीला चांगले काय वाईट काय असा विवेकबुद्धीने विचार करायला शिकवले तर, आपला समाज खरचं समृध्द, सुदृढ होईल.
        नवीन पिढीनेही मोठे काय सांगत आहेत, हे शांतपणे ऐकून घेत जे नाही पटलं ते त्यांना न दुखावता समजावून सांगावी.
        आपल्या भारतीय ऋषीमुनी, संत यांच्या दूरदृष्टीची कमाल आपल्याला ह्या coronavirus मूळ कळत आहे.आता जवळपास सर्वांच्या whatsapp वर एक मेसेज आहेच की भारतीय संस्कृतीप्रमाणे वागले तर आपले आयुष्य सोन्याप्रमाणे उजळून जाइल.
         तर एकमेकांचा आदर करा. आनंदी राहा. आणि निरोगी राहा.

Comments

Popular posts from this blog

नेहमी आनंदी कसे राहावे

राग का व कसा