राग का व कसा
माणसाच्या आयुष्यात राग नावाचा शब्द किंवा भावना जर नसेल तर कसं असेल आपले आयुष्य कल्पना करून पाहा
राग जर कुणाला आलाच नसता तर सगळेच एकमेकांशी गोड वागले असते आणि त्या गोड आणि चांगल्या वागण्याला काही किमतच राहिली नसती. कारण प्रत्येक वाईट गोष्टी मुळे चांगल्या गोष्टीची किंमत वाढते
राग हा प्रमाणात असेल तर तो खरच चांगला आहे. आलेल्या रागाचाही उपयोग होतो याच एक उदाहरण सांगतो.
एक सर्वसाधारण 40 ते 45% मार्क घेणाऱ्या मुलाला एकदा
सर खूप रागावतात त्याचा खूप अपमान करतात त्यामुळे त्या
मुलाला त्या सरांचा प्रचंड राग येतो. आणि तो मुलगा सरांना रागारागाने म्हणतो 80% मार्क घेऊन दाखवतो. त्या मुलाने
त्याला आलेल्या रागाचा असा उपयोग करून घेतला.
माणसांच्या आयुष्यातील खूप समस्या या विनाकारण व्यक्त केलेल्या रागमुळे आणि कधीही न केलेल्या प्रेमामुळे निर्माण होतात.योग्य वेळी राग व्यक्त कर. योग्य वेळी प्रेमही व्यक्त करता आले पाहिजे. थोड्या प्रमाणातील राग हा वाऱ्याची मंद झुळूक असते करण तो थोडासा राग निवळल्यानंतर मनाला दिलासा मिळतो आणि प्रियजनांच्या प्रेमामध्ये आणखी भर पडेल.
अति तेथे माती तसेच राग आणि भिकमाग हे खरच आहे. काहीजण म्हणतात माझ माझ्या रागावर ताबाच राहत नाही. अस नसतं राग ही काही आपला शाररिक आवेग थोडाच आह. शिंक,जांबळी ठसका. हे आपल्याला ताब्यात ठेवता येत नाही. राग हा आपण समोरची व्यक्ती, परिस्थिती पाहून व्यक्त करतो. म्हणजे म्हणजे राग केव्हा व्यक्त करायचा आणि केव्हा नाही, हे माणसाला बरोबर समजतं.
आता हे आपण एका उदाहरणातून बघू,
त्यामुळे एकाला राग आला तर दुसऱ्याने शांत बसने हाच राग या रोगावर एकमेव उपाय आहे. राग नावाचा रोग आटोक्यात आणायचा असेल तर संयम आणि सहनशीलता हेच औषध आहे.
त्यामुळे राग आल्यावर शांत राहा, संयमी व सहनशील रहा, म्हणजे तुमचे जीवन सुखी व आनंददायी होईल.
लेखक - सौ. संगीता दिग्रसकर


Comments
Post a Comment