स्त्री स्वातंत्र्य काल आणि आज

"फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश." स्त्रियांसाठी आता आकाश मोकळे झालेले आहे. मोकळ्या आकाशात वावरताना कधी कधी जाणीव होते परलंबितवाची कारण वर वर दिसणारे मोकळे आकाश खरेच मोकळे असते का? स्त्री ही स्वभावतःच समजूतदार असल्यामुळे तिला मिळालेला मोकळेपणा हा जबाबदारीच्या अदृश्य साखळदंडनी वेढलेला असतो. फार पूर्वी च्या काळी मोकळे आकाश सोडाच मोकळा श्वासही स्त्रीला घेता येत नसे मोकळा श्वास घाययला त्या स्त्रीला जगात यायलाच बंदी होती. पूर्वीच्या काळी स्त्रीपुरुष असा भेद भाव असे मुलांना चांगले शिक्षण तर मुलीना घरकामाला जुंपले जायचे कित्तेक घरात एका पाठोपाठ मुलीच होत राहिल्या तर दुसऱ्या लग्नाची तयारी किंवा गर्भपात करायची तयारी असायची. नीलाताईंना एकापाठोपाठ एक तीन मुली झाल्या प्रत्येक वेळी घरच्यांना मुलाची अपेक्षा होती. चौथ्यांदा गर्भलिंगनिदान केल्यावर चौथ्यांदा मुलगीच आहे हे कळाल्यावर सासरच्या गर्भपात करायच दडपण नीलाताईंनवर आणले. नीलाताईं खूप खचल्या पण शेवटी निलताईंनी सर्वांचा विरोध पथकरून मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना बराच सासरवास भोगावा लागला पण त्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर पाचव्यांदा गर्भधारणा झाली आणि मुलाचा गर्भ असल्याने सर्वजण काळजी घेऊ लागले. कारण वंशाला दिवा मिळणार होता. चार मुलींच्या पाठीवर एक राजपुत्र जन्माला आला.मुलाचे अतोनात लाड होऊ लागले. निलाताईचा मुली स्वतःच्या बुद्धिमतेचा जोरावर खूप शिकल्या उच्च पदावर नौकरिस लागल्या अति लाडाने मुलगा मात्र व्यसनाधीन होऊन आयुष्यात काही करू शकला नाही.उतारवयात चारही मुलींनी निलताईना आर्थिक आणि मानसिक आधार देऊन त्यांचे आयुष्य त्यांचे म्हातारपण सुसह्य केले.

Comments

Popular posts from this blog

नेहमी आनंदी कसे राहावे

आईवडील, कुटुंब आणि पिढीमधील सुवर्णमध्य

राग का व कसा